Lokmat Agro >हवामान > Weather Update: चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्राला मोसमी पावसाची आतूरता

Weather Update: चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्राला मोसमी पावसाची आतूरता

Weather Update: Cyclone conditions over North East Arabian Sea, Maharashtra likely to receive Monsoon rains | Weather Update: चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्राला मोसमी पावसाची आतूरता

Weather Update: चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर, महाराष्ट्राला मोसमी पावसाची आतूरता

राज्यात या भागांत वादळी पावसाचा तर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा,वाचा हवामान विभागाचा सविस्तर अंदाज

राज्यात या भागांत वादळी पावसाचा तर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा,वाचा हवामान विभागाचा सविस्तर अंदाज

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात तापत्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना आता मोसमी पावसाची आतूरता आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर सक्रीय होणार असून लवकरच मान्सूनचे राज्यात आगमन होणार आहे.

हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे सध्या बंगालच्या उपसागरावर सक्रीय असून कमी दाबाचा पट्टा येत्या दोन दिवसात केरळ आणि आंध्र प्रदेशला लागून परिसरात सरकणार आहे.

मान्सून दाखल होण्याआधी राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवले आहे. महाराष्ट्रात विदर्भ, कोकणातील काही भाग तसेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा असून पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती या भागात सक्रीय आहे. दरम्यान राज्यात तापमानाचा पारा वाढता असून राज्यात अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पुढील दोन दिवस काही भागांना अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

वाचा कुठे कोणता इशारा

अवकाळी पावसाचा इथे अलर्ट- बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम,यवतमाळ, अमरावती, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधूदूर्ग

उष्णतेची लाट- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Weather Update: Cyclone conditions over North East Arabian Sea, Maharashtra likely to receive Monsoon rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.