Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update जुलैच्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता

Maharashtra Weather Update जुलैच्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता

Weather Update: In the first week of July, there is a possibility of heavy rain in this district | Maharashtra Weather Update जुलैच्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता

Maharashtra Weather Update जुलैच्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात संततधार सुरू होणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जून महिन्याच्या सरासरीच्या ४८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी ५३.२ मिलीमीटर (१६ टक्के) पाऊस झाला होता. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ७.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात २१.५ मिली मीटर तर पाटगाव व कासारी धरण क्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

कीड व तणाला पोषक वातावरण
पावसाची उघडीप, ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांसाठी नुकसानकारक आहे. कीडाचा प्रार्दुभाव वाढण्याचा धोका असून विशेष करुन वेलवर्गीय पिकांना अशा वातावरणाचा अधिक फटका बसतो. उघडझाप राहिल्याने पिकांमधील तणाला पोषक ठरते. यासाठी पावसाची गरज असून सततच्या पाण्यामुळे तणाला ताकद लागत नाही.

Web Title: Weather Update: In the first week of July, there is a possibility of heavy rain in this district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.