Join us

Weather Update; राज्यात एकीकडे गारठा तर दुसरीकडे उन्हाचा चटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 4:02 PM

कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात १५.३ अंश सेल्सिअस झाली आहे.

कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवले गेले. राज्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात १५.३ अंश सेल्सिअस झाली आहे.

कमाल तापमान सोलापूर येथे ३९.६ नोंदवले गेले. येत्या दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी वर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे.

राज्यामध्ये जवळपास सर्वत्र हवामान कोरडे राहणार असून, तापमानाचा पारा चढता राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमान वाढू लागले आहे.

काही दिवसांमध्ये हा पारा चाळिशी पार करण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही आता वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करावा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

एकीकडे खूप तर दुसरीकडे कमी!राज्यात सोलापूरमध्ये सर्वाधिक ३९.६ तापमान झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर पुण्यात सर्वांत कमी किमान तापमान १५.३ अंशावर नोंदवले आहे. पुण्यातदेखील लोहगावात किमान तापमान १८.९ तर इतर शहरात मात्र १५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील कमाल व किमान तापमान

मुंबई३०.९२०.८
पुणे३६.९१५.३
रत्नागिरी३२.८२०.०
जळगाव३५.८१७.०
कोल्हापूर३७.१२१.५
नाशिक३५.४१५.८
सोलापूर३९.६२४.६
नांदेड३७.२२०.४
चंद्रपूर३६.२२०.८
नागपूर३७.०२२.१
टॅग्स :हवामानतापमानमहाराष्ट्रपुणेसोलापूर