Lokmat Agro >हवामान > Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

Weather Update; Rain forecast in Madhya Maharashtra and Marathwada in next two days; Yellow alert in some places | Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे.

पुढच्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने अंदाज दिला आहे. पुण्यात मात्र किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत आहे.

राज्यामधील छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' दिला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील, तर पुणे, सांगली, सातारा, जालना, ठाणे, रायगड, नंदुरबार या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील शनिवारी (दि.१ मार्च) विदर्भातील वाशिम, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरवती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच खान्देशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

राज्यातील कमाल व किमान तापमान

मुंबई३५.२२३.५
मालेगाव३८.२१९.०
महाबळेश्वर२९.३१७.०
सांगली३५.७२४.०
रलागिरी३८.०२४.०
छ. संभाजीनगर३४.८१८.८
नागपूर३४.६१८.०

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर अशा ५ जिल्ह्यांत व लगतच्या परिसरात २९ फेब्रुवारीला तसेच खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यं सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत १ मार्चला पावसाचा अंदाज आहे. तसेच, काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही जाणवते. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Weather Update; Rain forecast in Madhya Maharashtra and Marathwada in next two days; Yellow alert in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.