Join us

Weather Update पावसाचा जोर वाढला; कोल्हापूरात २२ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:50 AM

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात तब्बल साडे चार फुटांनी वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला, रविवारी सकाळपासून जोर काहीसा वाढला असून, दुपारनंतर पावसात वाढ होत गेली.

दिवसभर संततधार सुरू राहिली तर धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ होत आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यातच राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सर्वच नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे.

रविवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १८ फुटापर्यंत होती, सायंकाळी पाच वाजेपर्यंत २२ फुटापर्यंत पोहोचली होती. दुपारनंतर पाण्याचा वेग वाढला आहे.

राज्यात मुसळधार; पावसाचा जोर वाढलाराज्यात पावसाचा जोर वाढला आहे. खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरीवर्ग सुखावला आहे. ठाणे-मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सांगली, रायगड, अहमदनगर, पालघरमध्ये पावसाचा जोर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील बाजारपेठेत रविवारी पुराचे पाणी शिरले.

आज कुठे कोणता अलर्ट?ऑरेंज : रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ.रेड: रत्नागिरी.यलो: इतर सर्व जिल्हे.

पाच 'सर्कल'मध्ये अतिवृष्टी रविवारी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात 'करंजफेण', 'आंबा', 'मलकापूर', गगनबावडा व कडगाव या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

टॅग्स :पाऊसहवामानकोल्हापूरपाणीधरणनदी