Lokmat Agro >हवामान > Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक

Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक

Weather Updates Beware Chances of unseasonal rain are more in these 8 districts today and tomorrow | Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक

Weather Updates : सावधान! आज-उद्या 'या' ८ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता अधिक

काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

सध्या राज्यभर अवकाळी आणि गारपिटीचे वातावरण आहे. एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई, चाराटंचाई आणि दुरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच आज म्हणजे २० एप्रिल आणि उद्या २१ एप्रिल रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

अवकाळीचे वातावरण- मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (२०-२६ एप्रिल ) सप्ताहात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी (गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली ह्या ८ जिल्ह्यांत आज व उद्या (२०-२१ एप्रिल) अवकाळी पावसाची तीव्रता अधिक जाणवेल.
 
मुंबईसह कोकणात मात्र २०, २१ आणि २२ एप्रिलला ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते. २३ एप्रिल पासून अवकाळी वातावरणापासून कोकणात दिलासा मिळू शकतो. 

उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा आणि किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णतेचा सध्या काही दिवस महाराष्ट्रात प्रभाव कमी होऊन ह्यापासून दिलासा मिळू शकतो, असे वाटते. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune.  

Web Title: Weather Updates Beware Chances of unseasonal rain are more in these 8 districts today and tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.