Join us

मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरील निम्न पैनगंगा प्रकल्पाला नक्की कशामुळे होतोय विरोध?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 9:00 AM

कामाला विरोध : धरणविरोधी कृती समिती आक्रमक

मराठवाडा आणि विदर्भ सीमेतील पैनगंगा नदीवर निम्न पैनगंगा धरण उभारण्यात येत आहे. या धरणात सुमारे ९५ गावे बाधित होतील. या गावांचे पुनर्वसन शक्य नसून धरणामुळे मजुरांचे मोठे विस्थापन होणार असल्याने या धरणाला मराठवाडा व विदर्भ धरणविरोधी समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे.निम्न पैनगंगा धरण झाल्यास १.५ लाख शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. काळी, सुपीक, उत्पादन क्षमता असलेली जमीन या धरणात जाणार आहे. याशिवाय २५०० हजार एकर क्षेत्रावर असलेले जंगलदेखील नष्ट होणार असल्याने पशू-पक्ष्यांसह पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होणार आहे. यावेळी प्रल्हादराव जगताप, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, प्रा. प्रदीप राऊत, बालाजी ऐरावार, बाबाराव डोकोर, प्रल्हादराव गावंडे आदी उपस्थित होते.

Dam Water storage: राज्यातील धरणसमुहांमध्ये आज एवढा पाणीसाठा शिल्लक, जाणून घ्यापेसा अंतर्गत येणाऱ्या गावांचाही समावेश : तंवर

धरणाच्या नावाखाली जमीन अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, ना त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे हा धरण प्रकल्प शेतकऱ्यांसह मजुरांसाठी बाधक आहे. या धरण क्षेत्रात येणारी अनेक गावे ही पेसामध्ये आहेत. ग्रामपंचायतींनी धरणाच्या विरोधात ठराव दिले असतानाही टेंडर काढल्या जात आहेत. जमीन अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, ना त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या धरण क्षेत्रात येणारी अनेक गावे ही पेसामध्ये असल्याचे मुबारक तंवर यांनी सांगितले.

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक

निळवंडेतून पाणी सोडले

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. प्रवरा डाव्या कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्यातून सोमवारपासून आवर्तन सोडण्याच्या सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या.

टॅग्स :धरणमराठवाडापाटबंधारे प्रकल्प