Join us

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नीरा खोऱ्यातील धरणसाठ्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:29 AM

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, सध्या धरणात ४४.१२ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नीरा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वीर (ता. पुरंदर) धरणाच्यापाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, सध्या धरणात ४४.१२ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नीरा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी, या चार धरणांतील पाणीसाठा ४४.५६ टक्के म्हणजे १९.६०१ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे शाखा अभियंता शुभम सावंत व लक्ष्मण सुद्रिक यांनी सांगितले आहे.

शुक्रवारी (दि.१९) रोजी घेतलेल्या आकडेवारीनुसार वीर धरणात ४४.१२ टक्के म्हणजे ४.१५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी (१९ जुलैला) २५.७७ टक्के पाणीसाठा झाला होता.भाटघर धरणात ४१.५१ टक्के म्हणजे ९.७५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गेल्यावर्षी यादिवशी धरणात ३२.७३ टक्के म्हणजे ७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. नीरा देवघर धरणात ३२.८२ टक्के पाणीसाठा म्हणजे ३.८५० टीएमसी असून, गेल्यावर्षी यादिवशी ३६.२५ टक्के पाणीसाठा झाला होता.  गुंजवणी धरणात ५०.०४ टक्के पाणीसाठा म्हणजे १.८४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी यादिवशी ३२.२८ टक्के पाणीसाठा झाला होता. 

पाणलोट क्षेत्रात पाऊसभाटघर, नीरा देवघर, गुंजवणी व वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून, ओड्या- नाल्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे चारही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी चार धरणांचा मिळून ३२.२० टक्के पाणीसाठा म्हणजे १५.५६० टीएमसी पाणीसाठा नीरा प्रणाली धरणांमध्ये झाला होता. चालू वर्षी या चार धरणांमध्ये ४०.५६ टक्के म्हणजे १९,६०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नीरा नदीच्या धरण साखळी क्षेत्रातील गेल्यावर्षीची आकडेवारी पाहिल्यास यावर्षी धरणातील पाणीसाठा तब्बल १२ टक्के अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

नदीकाठच्या गावांना दिलासावीर धरणातून पुणे जिल्ह्यातील सासवड व सातारा जिल्ह्यांतील लोणंद येथील पाणी योजना अवलंबून आहेत. नीरा नदीकाठावर अनेक उपसा सिंचन योजना व पाणी योजना आहेत, दक्षिण पुरंदरमधील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, नीरा नदीच्या पाण्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माउलींच्या पादुकांना नीरा नदी स्नान सोहळ्यासाठी धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे

टॅग्स :धरणपाणीपाऊसनदीशेतकरीआषाढी एकादशीची वारी 2022