Lokmat Agro >हवामान > नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

What is the percentage of water storage in the dams in Neera valley; The water level of wells decreased | नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

नीरा खोऱ्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा; विहिरींची पाणी पातळी खालावली

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले.

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले.

शेअर :

Join us
Join usNext

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. नीरा खोऱ्यातील चार धरणांत बुधवार अखेर गतवर्षापेक्षा सरासरी २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चारही धरणात एकूण २६ हजार ६७६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ५५.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३६ हजार १४४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ७४.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे गतवर्षी जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात आले होते.

यावर्षी मात्र या चार धरणात आज रोजी अवघा ५५.२० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना द्यावयाच्या पाण्यावर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यातून एक उन्हाळी आवर्तन कमी मिळणार असल्याची माहिती समजते. जून २०२३ मध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला. हंगामाच्या शेवटी तुरळक सरी कोसळल्या तसेच परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप व रब्बी पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले याचा परिणाम उन्हाळी पिकांवर होत आहे.

गतवर्षापेक्षा स्थिती चिंताजनक
नीरा-देवघर धरणात ५,४७५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ४६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ९.८२१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८३.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणामध्ये १३,९८५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ५९.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी १७, २६१ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ७३.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, वीर धरणामध्ये ४,५४० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे.

म्हणजेच ४८.२६ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी ५,९८५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ६३.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गुंजवणी धरणामध्ये २,६७६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ७२.५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ३,०७७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ८३.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणामधील पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षापेक्षा आकडेवारीवरून चिंताजनक असल्याचे जाणवत आहे.

धरणपाणीसाठा (टक्केवारी)
नीरा-देवधर४६.६८
भाटघर५९.५१
वीर४८.२६
गुंजवणी७२.५२

विहिरींची पातळी खालावली
या हंगामात नीरा-देवघर, भाटघर, गुंजवणी ही धरणे कशीबशी १०० टक्के भरली; पण वीर धरण न भरल्याने धरणातून एक ठिपकाही विसर्ग सोडण्यात आला नाही. परिणामी नीरा नदीतून पावसाचे पाणी वाहिलेच नाही. त्यामुळे नदीकाठच्या विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.

Web Title: What is the percentage of water storage in the dams in Neera valley; The water level of wells decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.