Lokmat Agro >हवामान > सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

What is the total water storage of the state due to continuous heavy rains? | सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता.

राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली असून, एकूण पाऊस १२३ टक्के, अर्थात ५४५ मिलिमीटर इतका झाला आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ४२२ मिलिमीटर अर्थात ९५ टक्के पाऊस झाला होता.

या पावसामुळे राज्याच्या पाणीसाठ्यातही भरघोस वाढ झाली असून, राज्यात एकूण पाणीसाठा ५६०.३९ टीएमसी अर्थात ३९.१७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात ४३.६५ टक्के पाणीसाठा होता. संभाजीनगर विभागात सर्वांत कमी १२ टक्के पाणीसाठा आहे. राज्याची २२ जुलैपर्यंत सरासरी पाऊस ४४२.४ मिलिमीटर पडतो.

राज्यात सध्या कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस होत आहे. भंडारा, गोंदिया व पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. एकूण १५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. १९ जिल्हह्यांमध्ये जोरदार पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा? राज्यातील धरणांत एकूण पाणीसाठ्याची क्षमता ४८,२५४ दशलक्ष घनमीटर असून, राज्यात आजचा पाणीसाठा १५,८६४.८८ दशलक्ष घनमीटर अर्थात ५६०.३९ टीएमसी इतका झाला आहे. एकूण प्रकल्पीय साक्याच्या तुलनेत हा पाणीसाठा ३९.१७ टक्के इतका आहे.

विभागनिहाय पाणीसाठा
संभाजीनगर १२.१३%
नाशिक २८.३४%
पुणे ४३.३२%
अमरावती ४५.५७%
नागपूर ५४.७४%
कोकण ६६.६०%

राज्यात सर्वाधिक १९१ टक्के पाऊस सोलापूर जिल्ह्यात
चंद्रपूर, गडचिरोली, तसेच यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांसह कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
- राज्यात आतापर्यंत सर्वाधिक १९२ टक्के अर्थात ३२४.६ मिलिमीटर पाऊस सोलापूर जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल सांगली जिल्ह्यात ३८६.५८ (१७१.५८ टक्के) पाऊस झाला आहे.

२२ जुलैपर्यंतचा पाऊस
गेल्या वर्षी ४२२.१ मिमी ९५.४१%
या वर्षी ५४५ मिमी १२३%

Web Title: What is the total water storage of the state due to continuous heavy rains?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.