Lokmat Agro >हवामान > उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी

उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी

What percentage of Ujani Dam is filled, water will be available for agriculture from Ujani Dam | उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी

उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली.

शेअर :

Join us
Join usNext

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली. सायंकाळी २० हजार १०४ क्यूसेक झाला. यामुळे उजनीची टक्केवारी ३४ झाली आहे. आता शेतीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाजूस असलेल्या पिंपळ जोगे १२५० क्यूसेक, वडज १५०७० क्यूसेक, डिंभे ३०१८ क्यूसेक, घोड १०० क्यूसेक, चिल्लेवाडी ६०० क्यूसेक, कळमोडी ३१५ क्यूसेक, चास कमान २७७० क्यूसेक, भामा आसखेड ३६१६ क्यूसेक, वडीवळे ३६१६ क्यूसेक, कासारसाई ७५० क्यूसेक, वरसगाव १०५० क्यूसेक तर खडकवासला २५६८ क्यूसेक असे एकूण ३६ हजार १८५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी बंडगार्डन व दौंड येथे पोहोचल्यानंतर दोन्ही ठिकाणचा विसर्ग वाढून तो उजनीच्या दिशेने येणार आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पिंपळ जोगे ३४ मिमी, माणिकराव २७ मिमी, येडगाव ३५ मिमी, वडज १३ मिमी, डिंभे ५९ मिमी, घोड १८ मिमी, विसापूर १४ मिमी, मुळशी १२ मिमी, टेमघर ५५ मिमी, वरसगाव ४३ मिमी, पानशेत ४४ मिमी, तर खडकवासला 33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील २४ तासांत उजनी धरणात २ टीएमसी पाणी आले असून, टक्केवारी ही ४ वाढून ती ३४.१४ झाली आहे. टक्केवारी ३३ च्या पुढे गेल्यामुळे आता गरज भासल्यास उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत
चालू वर्षी धरण ३६ टक्के मायनस झाले होते. त्यातच पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष उजनीच्या पाणी पातळीकडे लागले होते. शेतकरी बांधव उजनी भरणार का? या चितेत असतानाच मागील दहा दिवसांत उजनीची पाणीपातळी संथ गतीने का होईना वाढून ती ३३ टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे आता शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार आहे. याचबरोबर गंभीर बनलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

धरणाची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९३.२५० मीटर

• एकूण जलसाठा ८९.९५ टीएमसी
• उपयुक्त साठा १८.२९ टीएमसी
• टक्केवारी ३४.१४
इन्फ्लो
• बंडगार्डन ७८२१ क्युसेक
• दौंड २०१०४ क्युसेक

Web Title: What percentage of Ujani Dam is filled, water will be available for agriculture from Ujani Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.