Join us

येत्या तीन दिवसात तापमानात होणार बदल, हवामान विभागाने विभागनिहाय काय दिला अंदाज?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 16, 2024 10:26 AM

काल साताऱ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, इतर विभागात कशी परिस्थिती?

काल राज्यात विविध भागात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी होती. दरम्यान, साताऱ्यात काल (दि १६) सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने विशेष हवामान बुलेटिनमध्ये नोंदवले.

सोमवारी बहुतांश ठिकाणी पारा चढाच असल्याचे पहायला मिळाले. काल सुमारे १३ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशांदरम्यान होता. या भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर व मध्य महाराष्ट्रात काल तापमान सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक होते. उर्वरित ठिकाणी ते सामान्य असल्याचे दिसून आले. पुढील दोन दिवसात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून कोकण भागात उष्ण व दमट स्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मध्य महाराष्ट्रात तापमान वाढणार

पुढील तीन ते चार दिवसात मध्य महाराष्ट्रातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यापुढील दोन दिवस तापमात फारसा बदल होणार नसून कमाल तापमान ४० ते ५० अंशांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात कसे राहणार तापमान?

पुढील तीन ते चार दिवसात तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :तापमानहवामानसातारामराठवाडाविदर्भ