Lokmat Agro >हवामान > महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे धरण कधी भरणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे धरण कधी भरणार

When will be this largest dam in Maharashtra filled? | महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे धरण कधी भरणार

महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे धरण कधी भरणार

भीमा खोऱ्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनी Ujani Dam धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील ३ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

भीमा खोऱ्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनी Ujani Dam धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील ३ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

टेंभुर्णी : भीमा खोऱ्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील ३ धरणे ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. दौंड येथून ४ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनी पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

भीमा खोऱ्यातील पावसावर अवलंबून असलेल्या उजनी धरणातीलपाणी पातळी दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजता वजता ३३.८१ टक्के झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट होत गेली होती. दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे दौंड येथील विसर्गात सायंकाळी ४ हजार १०१ क्युसेक वाढ झाली होती.

रविवारी सकाळी २ हजार २९२ क्युसेक विसर्ग दौंड येथून चालू होता. भीमा खोऱ्यातील संततधार पावसामुळे खडकवासला, कळमोडी, वडिवळे, पानशेत या धरणांची स्थिती सुधारली आहे. या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

पाणलोट क्षेत्रात २ मिमी पाऊस
उजनी पाणलोट क्षेत्रात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या उजनी धरणात ४५.५७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर येण्यासाठी आणखी १८.०९ टीएमसी पाण्याची गरज आहे. गतवर्षी १५ जुलै २३ रोजी उजनी धरणाची पाणी पातळी वजा ३४.५४ टक्के होती.

अधिक वाचा: Koyna Water Level: कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी

Web Title: When will be this largest dam in Maharashtra filled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.