सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. यात अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. मात्र येणार्या खरीप हंगामात ही उणीव भरून निघेल या अपेक्षेने शेतकरी आलेल्या संकटाला तोंडदेत खरीप हंगामासाठी योग्य नियोजन आखत आहे. त्याच अनुषंगाने जाणून घेऊया काय असेल यंदाच्या मान्सूनची वाटचाल.
आजपासुन एक सप्ताहनंतर म्हणजे शनिवार दि.१९ मे दरम्यान, देशाचा नैऋक्त मोसमी पाऊस (मान्सून) देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यन्त दस्तक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्थात, एक जून ह्या सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावणारा दक्षिण-पश्चिम मान्सून बंगालच्या उपसागरात प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो, ह्यावरच एक जून ह्या तारखेची निश्चिती ठरवली जाईल. म्हणजेच अजुन तीन आठवड्याचा कालावधी लोटावयाचा आहे.
लेखक
श्री. माणिकराव खुळे
निवृत्त जेष्ठ हवामानतज्ञ