Yeldari Dam :
हिंगोलीसह परभणी आणि नांदेड जिल्ह्याची तहान भागविणारा प्रकल्प असलेल्या येलदरी प्रकल्पात अजूनही समाधानकारक पाण्यासाठा वाढला नाही. परिणामी नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यातील दोन महिने उलटून गेले आहेत, मात्र अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा अजूनही जेमतेम आहे.परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना येलदरी प्रकल्पावरून चालविल्या जातात. ८०९,७७० दलघमी जिवंत पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पात सध्या ३९३.०७१ दलघमी एवढाच पाणीसाठा झाला आहे.जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ३३.१४ टक्के एवढी आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पावसाळ्यातील आणखी दोन महिने शिल्लक असून या काळात प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात ५९ टक्के पाऊस■ यावर्षी जिल्ह्यामध्ये पावसाची टक्केवारी वाढली आहे; परंतु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ५९.२७ टक्के पाऊस झाला.■ जिल्ह्यात दरवर्षी ७९५.३० मि.मी. पाऊस होतो. प्रत्यक्षात ४७१.४० मि.मी. पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ६३.८८ टक्के पाऊस झाला. या तालुक्याची वार्षिक सरासरी ७२९.७० मि.मी. असूनप्रत्यक्षात ४६६.१० मि.मी. पाऊस झाला आहे.■ हिंगोली तालुक्यात ६०.५८ टक्के, कळमनुरी ६१.४७ टक्के, वसमत ५२.४९ टक्के आणि औंढा तालुक्यामध्ये ५८.२४ टक्के पाऊस झाला आहे.