Lokmat Agro >हवामान > आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा

आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा

Yellow alert for rain across the state today, how will the rain be for the next two days? | आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा

आज राज्यभर पावसाचा यलो अलर्ट, पुढील दोन दिवस मुसळधारा

कोकणात जोरदार पावसाच्या नादात बाप्पाचे विसर्जन झाले.

कोकणात जोरदार पावसाच्या नादात बाप्पाचे विसर्जन झाले.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यभर जोरदार पावसाची शक्यता असून नंदुरबार व धुळे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विस्तीर्ण परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  यावेळी वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रति तास असणार असून अरबी समुद्रालगत हा वेग 55 किमी प्रतितास असेल. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्यास सांगण्यात आले आहे.

मागील दोन दिवस राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून 29 सप्टेंबर पर्यंत पाऊस ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

दरम्यान, कोकणात जोरदार पावसाच्या नादात गणपती विसर्जन झाले आहे. चाकरमानी आपापल्या कामाच्या ठिकाणी परत निघाले आहेत. घरोघरी नातवंडांनी भरलेले घर पुन्हा रिकामे झाले आहे.  हवामान तज्ञ के. एस.  होसाळीकर यांनी याच अनुषंगाने एक ट्विट केले आहे. 

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1705995436333707562

दरम्यान, आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक (76 mm) पावसाची नोंद झाली.  सकाळपासून नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. आज धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानेही वर्तवली आहे. आज सकाळपासून नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. आज धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानेही वर्तवली आहे.

असा असेल पुढील पावसाचा अंदाज

 

Web Title: Yellow alert for rain across the state today, how will the rain be for the next two days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.