आज राज्यभर जोरदार पावसाची शक्यता असून नंदुरबार व धुळे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विस्तीर्ण परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 45 ते 55 किमी प्रति तास असणार असून अरबी समुद्रालगत हा वेग 55 किमी प्रतितास असेल. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्यास सांगण्यात आले आहे.
मागील दोन दिवस राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून 29 सप्टेंबर पर्यंत पाऊस ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणात जोरदार पावसाच्या नादात गणपती विसर्जन झाले आहे. चाकरमानी आपापल्या कामाच्या ठिकाणी परत निघाले आहेत. घरोघरी नातवंडांनी भरलेले घर पुन्हा रिकामे झाले आहे. हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याच अनुषंगाने एक ट्विट केले आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1705995436333707562
दरम्यान, आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक (76 mm) पावसाची नोंद झाली. सकाळपासून नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. आज धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानेही वर्तवली आहे. आज सकाळपासून नाशिक व छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. आज धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रानेही वर्तवली आहे.
असा असेल पुढील पावसाचा अंदाज