Lokmat Agro >हवामान > नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार? 

नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार? 

Yellow alert of rain for five districts including Nagpur today, how intense will it be? | नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार? 

नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार? 

चक्राकार वाऱ्यांची स्थिती पश्चिम विदर्भासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहेत.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती पश्चिम विदर्भासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पूर्व विदर्भ, खान्देशासह मराठवाड्यात आजही अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हलक्या ते मध्यम सरींचा अवकाळी पाऊस राहणार असून तूरळक ठिकाणी गारपीट संभवते. दरम्यान, उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम असून तापमान वाढते आहे.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती पश्चिम विदर्भासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहेत. परिणामी आज विदर्भ-खान्देशातील पाच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानाने वर्तवले आहे.

कुठे देण्यात आलाय यलो अलर्ट?

अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या तापमान वाढले असून पारा चाळीशीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी ३५ ते ३८ पर्यंत तापमानाची नोंद होत आहे. विदर्भात उद्यापासून तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार असून २ ते ३ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Yellow alert of rain for five districts including Nagpur today, how intense will it be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.