अहमदनगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी माफक दरात सॅनेटरी नॅपकिन पुरविण्यात येणार आहेत़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे १ लाख १८ हजार ५७५ सॅनेटरी नॅपकिन पॅकेट उपलब्ध झाले आहेत़केंद्र शासनाच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातून ग्रामीण भागातील मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छता संवर्धन व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावनिहाय किशोरवयीन मुलींच्या संख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वितरित केलेले आहे.ग्रामीण भागातील १० ते १९ वयोगटातील मुलींना आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकांच्या मार्फत घरोघर जाऊन या सॅनिटरी नॅपकीनचे वाटप केले जात आहे़ तसेच मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काय काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी, या विषयीची जनजागृतीही ग्रामीण भागांमध्ये आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका यांना देण्यात आलेले आहे.मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांनाही सामोरे जावे लागते, ही बाब लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले आहे.सहा रुपयाला एक पॅकेटया उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना ६ रुपयांना एक सॅनिटरी नॅपकिनचे पॅकेट वितरित केले जात आहे़ त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविकेची माध्यमातून गृहभेटी देऊन मासिक पाळीची शास्त्रीय कारणे, या काळात शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी तसेच काय काळजी घ्यावी, पौष्टिक आहार कोणता घ्यावा याविषयीची माहिती किशोरवयीन मुलींना दिली जात आहे.
किशोरवयीन मुलींसाठी १ लाख सॅनेटरी नॅपकिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 4:53 PM