केडगाव येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सातपुते यांनी पाठपुरावा करून केडगावमधील शिवांजली मंगल कार्यालय येथे शंभर बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेना नेते विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गिरीश जाधव, नगरसेवक दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, परेश लोखंडे, संतोष ज्ञानअप्पा, सुनील सातपुते, मुकुंद जोशी, ओमकार सातपुते, टिनू भंडारी, मनीष गुगळे, विशाल वालकर, महेश राऊत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
केडगावमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी दवाखाने फुल्ल झाल्याने गोरगरीब रूग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी होती. सातपुते यांनी यात पुढाकार घेत कोविड सेंटर मंगळवारपासून सुरू केले आहे. रूग्णांनी याठिकाणी येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले.