विंचरणा नदीकाठी साकारणार शंकराची २१ फूट उंच मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:48+5:302021-02-13T04:19:48+5:30
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प तयार केले आहे. ही मूर्ती बसविण्याचे काम सुरू आहे. आ. पवार ...
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प तयार केले आहे. ही मूर्ती बसविण्याचे काम सुरू आहे. आ. पवार यांनी व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण माध्यमातून जामखेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे शहरात बदल होताना दिसत येत आहे. त्यातच शहरातील धाकटी नदी व विंचरणा नदीचे सुशोभिकरण सुरू आहे. याच अनुषंगाने जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या धर्तीवर शहरातील विंचरणा नदीकाठावर नगर-जामखेड रस्त्यावरील पुलाजवळ भव्य २१ फूट उंच शंकराची मूर्ती बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी बागबगीचाही करण्यात येणार आहे. सदर शिल्प तयार करण्याचे काम सहा महिन्यांपासून सुरू होते. तर शिल्प ठेवण्याचा कठडा हा २० दिवसांत कर्नाटक येथील कामगारांनी तयार केला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्या शिल्पासोबत सेल्फी काढता येणार आहे. नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे २१ फुटांचे शिल्प तयार केले आहे. लॉकडाऊननंतर पहिलेच शिल्प त्यांनी तयार केले आहे. १५ रोजी पांडुरंग देवा शास्त्री यांच्या हस्ते महापूजा व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
..
१२ शंकर मूर्ती
..
ओळी-जामखेड येथे विंचरणा नदीच्या काठावर भगवान शंकराची मूर्ती बसविण्याचे काम सुरू आहे.