नव्याने २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, नगरमध्ये आणखी एका तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, भिस्तबाग परिसरातही आढळले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:23 PM2020-07-13T12:23:14+5:302020-07-13T12:24:13+5:30
अहमदनगर-सोमवारी सकाळी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील १५ जणांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृत्यू झाला.
अहमदनगर-सोमवारी सकाळी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहरातील १५ जणांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी एका तरुणाचा मृत्यू झाला.
रविवारी तोफखाना परिसरात आठ, भिस्तबाग परिसरात १६, भोसले आखाडा परिसरात सात, सावेडी परिसरात दोन आणि केडगावमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. सोमवारी सकाळी नगर शहरात आढळून आलेल्या १५ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नगर शहरातील गवळी वाडा येथील नऊ, चितळे रोड येथील एक आणि शहराच्या मध्यवस्तीत चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एक, श्रीगोंदा शहरात पाच आणि तालुक्यातील वडळी येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
सोमवारी सकाळी १५ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ६४९ इतकी झाली आहे. दरम्यान आज सकाळी कापड बाजारातील एका १४ वर्षीय तरुण व्यापाºयाचा मृत्यू झाला. गत आठवड्यात याच तरुणाच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
सकाळी १५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये नगर शहरातील सात, श्रीरामपूर शहरातील सात, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या एकूण रुग्णसंख्या ९६३ इतकी असून २९२ जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी झआली आहे.
---------------
भिस्तबाग परिसरात १६ रुग्ण
नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग परिसरातील पंचवटी कॉलनीत १६ रुग्ण आढळून आले आहेत. तिथे महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रविवारी नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ४२ रुग्ण आढळून आले आहेत.