नगर जिल्ह्यात आज २४ नवे रुग्ण वाढले; शहरातील १४ रुग्णांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:00 PM2020-07-03T14:00:26+5:302020-07-03T14:01:20+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. दरम्यान आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. दरम्यान आज पुन्हा २४ रुग्ण बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नगर शहरातील १४ रुग्णांचा समावेश आहे.
शुक्रवारी येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात नगर शहरातील १४, भिंगार २, संगमनेर तालुका २ (कुरण आणि एस.बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) १, दाढ बुद्रूक (राहाता) १, खेरले (पाथर्डी) १, भोंदरे (पारनेर) १, केसापूर (राहुरी) १, कोळगाव (श्रीगोंदा) १.
दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बºया झालेल्या रुग्णांची संख्या आता ३७० इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.