एकात्मिक गृहनिर्माणचे ४ कोटी गेले परत; कोपरगावात नव्याने ३ हजार घरकुलांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:03 PM2017-11-06T16:03:00+5:302017-11-06T16:05:36+5:30
२०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.
रियाज सय्यद
कोपरगाव : राज्य शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम नगरपालिका हद्दीत २०१५ पर्यंत वेळेमध्ये सुरू होऊ न शकल्याने सुमारे ४ कोटी रूपयांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरात ३ हजार १०८ घरकुलांची निर्मिती केली जाणार आहे.
सन २०१०-११ साली एकात्मिक गृहनिर्माण योजनेच्या अनुषंगाने पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. तत्कालिन पालिका पदाधिकाºयांनी खडकी परिसरात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हे काम २-३ वर्षे रखडले. पुढे २०१४ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना सरकार आरूढ झाले. आणि केंद्र सरकारने ही योजनाच बंद करून पंतप्रधान आवास योजना अस्तित्वात आणली. २०१५ अखेरपर्यंत एकात्मिक गृहनिर्माण योजनेचे काम सुरू न झाल्याने मंजूर ४ कोटींचा निधी परत सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.
२०१६-१७ पासून पंतप्रधान आवास योजने अंतर्गत नगरपालिकेस ३ हजार १०८ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात १० टक्के म्हणजेच ३०८ घरांची उभारणी केली जाणार आहे. महेंद्रकुमार दवे अॅण्ड असोसिएट्स या ठेकेदारामार्फत शहरातील २ हजार घरांचे सर्व्हेक्षण झाले आहे. २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी लाभार्र्थींनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने पालिकेत संपर्क साधावा.
-शिल्पा दरेकर, मुख्याधिकारी