६० किलोमीटरवरचा शत्रू हेरणारे रडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:08 AM2018-08-11T11:08:51+5:302018-08-11T11:09:00+5:30

सीमारेषेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून आलेला शत्रू हेरणारे अत्याधुनिक रडार, पाणी व जमिनीवरून चालणारा १४ टनी रणगाडा व त्यावर सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत बॉम्ब फेकणारी मशीन, किरर्र अंधारातही सुमारे सहा किलोमीटरपर्यंत शत्रूला हेरणारी दुर्बिण यासह अत्याधुनिक बंदुका, लाँचर, मिसाईल आणि बरेच काही...

60 kilometers of enemy's headless radar | ६० किलोमीटरवरचा शत्रू हेरणारे रडार

६० किलोमीटरवरचा शत्रू हेरणारे रडार

अहमदनगर : सीमारेषेपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरून आलेला शत्रू हेरणारे अत्याधुनिक रडार, पाणी व जमिनीवरून चालणारा १४ टनी रणगाडा व त्यावर सुमारे ५ किलोमीटर अंतरापर्यंत बॉम्ब फेकणारी मशीन, किरर्र अंधारातही सुमारे सहा किलोमीटरपर्यंत शत्रूला हेरणारी दुर्बिण यासह अत्याधुनिक बंदुका, लाँचर, मिसाईल आणि बरेच काही...
येथील मॅकेनाईल्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये (एमआयआरसी) शुक्रवारी आयोजित केलेल्या शस्त्र प्रदर्शनात लष्कराची आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धसामग्री नागरिकांना दाखवण्यात आली. सकाळी दहा वाजता एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. केंद्रीय विद्यालय, आर्मी पब्लीक स्कूल, तसेच शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. भारतीय लष्कराचे सामर्थ्य व क्षमतेची ओळख सामान्य नागरिकांना व्हावी, तसेच लष्कराकडे युवकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन लष्कराने आयोजित केले होते. प्रारंभी मिलिट्री बँडच्या पथकाने अनेक देशभक्तीपर गाण्यांवर प्रात्यक्षिके सादर केली. रणगाडे, वाहने, शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी खुली झाली. सैनिकांचे देशाप्रती योगदान, अथक परिश्रम व युद्धसामग्री पाहून विद्यार्थी, नागरिक हरखून गेले.

कॅरिअर मोर्टर ट्रॅक्ड (सीएमटी)
सहा आसनी व १४ टनी असणारा हा रणगाडा पाणी व जमिनीवर एकाच वेळी चालतो. यावर असलेल्या तोफेतून ५ किलोमीटरपर्यंत अचूक बॉम्ब वर्षाव होऊ शकतो. ११० बॉम्बचा साठा यात असतो. युद्धजन्य स्थितीत शत्रूच्या हद्दीतून सैनिक वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो.

मिलन सिस्टीम
एकाच वेळी पाच मिसाईल घेऊन जाणारी ही जीप युद्धात सर्वात पुढे असते. चालक, कॅप्टन व गनर असे तिघेच या वाहनात असतात. चालत्या वाहनातून सुमारे २ किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची क्षमता यातील लाँचरमध्ये आहे. फ्रान्स व पश्चिम जर्मनीच्या बनावटीची ही यंत्रणा आहे.

५.५६ एमएम इन्सास एलएमजी
ही एक अशी रायफल आहे, जी प्रत्येक जवानाकडे असते. ३० राऊंडची मॅकझिन यात असते, जी १ किलोमीटरपर्यत अंतरावरील शत्रू अचूक टिपू सकते. अ‍ॅटो फायरची सुविधाही यात आहे.
आरएल एमके ३
हे एक असे लाँचर आहे, ज्यातून दोन किलोमीटर अंतरापर्यंत मिसाईल फायर केले जाते. विशेषत: यातून अशी मिसाईल फायर होतात, जी युद्धभूमीवर अंधारात काही वेळ प्रकाश पाडू शकतात. तसेच शत्रूला चकमा देण्यासाठी दिवसाही धुराचा अंधार करू शकतात.
एचएचटीआय 
ही अशी दुर्बिणसदृश यंत्रणा आहे, जी सुमारे सहा किलोमीटरवरील लक्ष्य मिट्ट अंधारातही हेरू शकते. युद्धात रात्रीच्या वेळी या यंत्रणेचा खूप उपयोग होतो.

Web Title: 60 kilometers of enemy's headless radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.