पळवेत ७० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:42+5:302021-09-04T04:25:42+5:30
पळवे : पळवे खुर्द ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोनशे ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत पळवे ...
पळवे : पळवे खुर्द ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोनशे ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत पळवे खुर्द गावात १८ ते ६५ वयोगटातील सुमारे ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती सरपंच सरिता जगताप व चेअरमन संजय तरटे यांनी सांगितले.
पळवे खुर्द आणि बुद्रूक येथे जवळपास कोरोना हद्दपार झाल्याचे चित्र आहे. सध्या रुग्णांची संख्या घटल्याने सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. शेतीची कामे सुरळीत झाले आहेत. तरीही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपसरपंच संजय नवले यांनी केले आहे.
यावेळी भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत देशमुख, हरिभाऊ भंडंलकर, दत्तात्रय जगताप, गणपत जगताप, सरपंच सरिता जगताप, चेअरमन संजय तरटे, माजी सरपंच नानाभाऊ गाडीलकर, माजी जि. प. सदस्य शिवाजी गाडिलकर, तात्याभाऊ देशमुख, पोपट तरटे, छाया गवळी आदी ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य अधिकारी डॉ. सुदाम बागल उपस्थित होते.
...........
फोटो ओळी :
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.