अहमदनगर: मित्र कोणत्याही वयोगटातील असो ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपमधील सदस्यांनी व्यायामाला दांडी मारणाऱ्या मित्राच्या घरासमोर भल्या सकाळी धडक मारत थेट भांडे जावून त्याला जागे करत थेट मैदानावर आणले. भांडे वाजविल्याने संपूर्ण कॉलनी जागी झाली मात्र, मित्रांचा या उपक्रमाचे नागरिकांनीही कौतूक केले.
मित्र आपली साथ देतात तशी वेळेला कानही पिळतात, मग तो कोणत्याही पद्धतीनं का असेनात. असाच प्रकार भिंगारमध्ये घडला. अशोक लोंढे (वय-५४) यांची ह्रद्याची शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी त्यांना नियमीत व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे सकाळी उठणे होत नसल्याने त्यांनी व्यायामाला दांडी मारण्यास सुरुवात केली. आपला ग्रुपचा सदस्य अनेक दिवसापासून येत नसल्याने सर्वांच्य लक्षात आले. त्याला अनेक वेळा सूचना देऊन देखील व्यायामासाठी तो हजर न झाल्याने सर्व सदस्यांनी दोन दिवसांपूर्वी पहाटेच त्यांच्या घरी जाऊन त्याला उठवण्यासाठी भांडे वाजविण्याची भन्नाट युक्ती वापरली.
भांड्याच्या आवाजाने जागे झालेल्या मित्रांना थेट मोटारसायकलवर बसवून मैदानात व्यायामासाठी नेले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अविनाश जाधव, विठ्ठलराव राहिंज, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपकराव बडदे, दिलीप गुगळे, मनोहर दरवडे, सुमेश केदारे, एकनाथ जगताप, अशोक पराते, प्रकाश देवळालीकर, अनंत सदलापूर, अभिजीत सपकाळ, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, कुमार धतुरे, योगेश चौधरी, जहीर सय्यद, नंदू अहिरे, सुनील लालबोंद्रे, बबनराव चिंचिणे आदी उपस्थित होते.