अपघातविषयक जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:18+5:302021-02-14T04:19:18+5:30
श्रीगोंदा : अहमदनगर व श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच रेणुकामाता शैक्षणिक संस्था, बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वे ...
श्रीगोंदा : अहमदनगर व श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच रेणुकामाता शैक्षणिक संस्था, बोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान श्रीगोंदा फॅक्टरी येथे पार पडले. यावेळी रस्ते अपघातविषयक विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
श्रीगोंदा बसस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात रेणुकामाता बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेच्यावतीने उपस्थित प्रवासी, चालक-वाहक यांना रस्ता सुरक्षा, वाहने चालवताना घ्यावयाची काळजी तसेच अपघात घडण्याची कारणे व उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सोमनाथ गोरे, विठ्ठल जिंदमवार, विकास पवार, शशिकांत पठारे, अण्णासाहेब थोरात, बी. बी. पवार, बी. एस. तळेकर उपस्थित होते.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थांनी ट्रक, ट्रॅक्टर चालकांमध्ये वाहतूकविषयक नियमांविषयी पथनाट्याद्वारे जनजागृती केली. वाहतूकविषयक नियमांच्या माहिती पुस्तिकांचे वाटप केले.
यावेळी ‘नागवडे’चे संचालक अरुणराव पाचपुते, योगेश भोयटे, युवराज चितळकर, प्रा. राकेश गर्जे, प्राचार्या प्रतिभा गर्जे, आयुब शेख, उद्धव नलावडे, अमोल शिरसाठ उपस्थित होते.