संगमनेर : मालवाहू ट्रक व पाण्याचा टॅँकरच्या झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा दुमाला गावच्या शिवारात झाला.विनोदकुमार लालजी सोनकर (वय ३०, हल्ली मुंबई, मुळ रा. भगतापुर, कंसापूर और महाराजगंज, संत रविदास नगर, महाराजगंज, उत्तरप्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.नाशिकच्या दिशेने येत असलेला पाण्याचा टॅँकर (एम. एच. ४३ वाय. २९३१) कासारा दुमाला हद्दीतील उड्डाण पुलावरून डाव्या बाजूला खाली वळण घेत होता. त्याचवेळी पाठिमागून येणाऱ्या मालवाहू ट्रकची (एम. एच. ०४. एच. एस. १०९६) या टॅँकरला जोराची धडक बसली. टॅँकर रस्त्यावर पलटी होवून ट्रक कासारा दुमाला गावाकडे जाणाºया उपरस्त्यालगत असलेल्या दुभाजकाच्या बाजूने असलेल्या शेतात घुसला. ट्रक चालक मध्येच फसल्याने अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडून त्यास बाहेर काढत उपचारार्थ शहरातील एका खासगी रूग्णालयात हलविले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक विजय खाडे तपास करीत आहेत.
नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर अपघात : ट्रकचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:29 PM