कोपरगावात कोरोनाचे नियम मोडल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:04+5:302021-09-26T04:24:04+5:30
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान कायमस्वरूपी मास्क वापरावा. तसेच बँकेत, हॉटेलमध्ये शारीरिक अंतर पाळावे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू ...
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासादरम्यान कायमस्वरूपी मास्क वापरावा. तसेच बँकेत, हॉटेलमध्ये शारीरिक अंतर पाळावे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तंबाखू खाणे व थुंकणे टाळावे. वैद्यकीय कामासाठी आपल्या तालुक्यातील डॉक्टरांना संपर्क साधावा, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडून नये. दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करू नये. आस्थापनांमध्ये अनियमितता आढळून आल्यास कारवाई करीत लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्यात येईल. दर १५ दिवसाला दुकान मालक व कामगार यांची आरटीपीसीआर चाचणी करणे, अहवाल बाधित आल्यास १५ दिवस बंद ठेवण्यात येईल. विवाह सोहळा व अंत्यविधीसाठी ठरवून दिलेली व्यक्ती संख्येची मर्यादा पाळावी. एखादी व्यक्ती वरील सर्व नियमांचा भंग करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.