अनोप मंडळावर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:06+5:302021-06-25T04:16:06+5:30

या संघटनेविरुद्ध देशभरात गुरुवारी निवेदन देण्यात आले. समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, स्थानकवासी समाजाचे अध्यक्ष रमेश लोंढा, श्वेतांबर समाजाचे अध्यक्ष ...

Action should be taken against Anoop Mandal | अनोप मंडळावर कारवाई करावी

अनोप मंडळावर कारवाई करावी

या संघटनेविरुद्ध देशभरात गुरुवारी निवेदन देण्यात आले. समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, स्थानकवासी समाजाचे अध्यक्ष रमेश लोंढा, श्वेतांबर समाजाचे अध्यक्ष शैलेश बाबरिया यांच्यासह अनिल पांडे, ॲड. सुहास चुडीवाल, भाऊ डाकले, नगरसेवक किरण लुणिया, कल्याण कुंकूलोळ, नंदू पापडीवाल, राजेश चुडीवाल, जितेंद्र कासलीवाल, महावीर काला, प्रीतम पांडे, रमेश गुंदेचा, रमेश पाटणी, राजेंद्र पाटणी, महेंद्र पांडे, प्रशांत पांडे, नितीन मिरीकर, मयूर पाटणी, प्रमोद गंगवाल, उदय गंगवाल, सुरेंद्र शाह, प्रशांत पांडे, आदी यावेळी उपस्थित होते.

अनुप मंडळ संघटना गावागावात जाऊन जैन समुदाय, जैन धर्म व जैन साधू ,साध्वी यांच्याबाबत उलटसुलट चर्चा करतात. सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश टाकतात. भारताच्या संविधानविरोधी सामाजिक तणाव करतात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

-----

फोटो ओळी - २४ जैन समाज

अनोप मंडळावर बंदी आणावी या मागणीचे प्रांताधिकारी यांना सकल जैन समाजाचे प्रतिनिधी.

-----

Web Title: Action should be taken against Anoop Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.