३० जूनपर्यंत शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन पालकांचा मराठी माध्यमांच्या शाळेकडील नक्की कल कळणार आहे. पटसंख्येअभावी सावंतवाडीसारखी आणखी शाळा बंद पडू नये यासाठी तालुका शिक्षण विभाग व शिक्षक सजग झाले आहेत. अधिकारी यांनी शाळाभेटी व शिक्षकांनी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या गृहभेटी वाढवल्या आहेत.
कोरोनामुळे सर्वच शाळा बंद आहेत मग इंग्रजी माध्यमाच्या शाळेत फी उगाच कशाला भरायची? म्हणून सध्या मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याचे चित्र आहे. धामणगाव आवारी, उंचखडक बुद्रूक, निळवंडे, रूंभोडी, इंदोरी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मराठी माध्यमाच्या शाळेत मुले दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळात ऑनलाइन शिक्षण सुरू असून शिक्षकांची शाळांमध्ये पन्नास टक्के उपस्थिती असते. पालकांचे समंती पत्र घेऊन काही गावात गट अध्यापन पध्दतीने ऑफलाइन ज्ञानदानाचे काम सुरू होताना दिसत आहे.
................
२४सावंतवाडी