कोरोनावर मात करून सात कैदी पुन्हा कोपरगाव सबजेलमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:19+5:302021-04-20T04:22:19+5:30
कोपरगाव : कोपरगाव सबजेलमधील आठ कैदी कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपकार करून आठ पैकी ...
कोपरगाव : कोपरगाव सबजेलमधील आठ कैदी कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपकार करून आठ पैकी ७ कैद्यांना दोन दिवसांपूर्वी कोपरगाव सबजेलमध्ये आण्यात आले, तर एका कैद्यावर अजून उपचार सुरू असल्याचे सबजेलचे प्रभारी तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग यांनी सांगितले.
कोपरगाव सबजेलमध्ये कोपरगाव शहर व तालुका, शिर्डी, लोणी, राहाता अशा पाच पोलीस ठाण्याचे गुन्ह्यातील आरोपी कैदेत असताना ६ एप्रिलला ८ बाधित आढळले होते, तर ७ एप्रिलला ३४ कैदी बाधित आढळले होते. त्यापैकी ६ एप्रिल रोजी बाधित आढळलेल्या कैद्यांना उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, तर ३४ कैद्यांना लक्षणे नसल्याने सबजेलमध्येच उपचार देण्यात आले. त्यामुळे तेही कोरोना मुक्त झाले आहे. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांना जेलमध्येच १४ दिवस विलगीकरणात ठेवले असल्याचे दुशिंग यांनी म्हटले आहे.