Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:39 AM2024-11-23T11:39:59+5:302024-11-23T11:40:20+5:30

ahilyanagar Assembly Election 2024 Result Live Updates : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ मतदारसंघाचे सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचे दिसत आहे.

ahilyanagar vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live ahilyanagar | Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने

Ahilyanagar Assembly Election 2024 Result : अहिल्यानगरमध्ये दिग्गजांना धक्के! थोरात, रोहित पवार, लंके पिछाडीवर; महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने

ahilyanagar Assembly Election 2024 Result Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. जे पहिले कल हाती येत आहेत त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात महायुतीला यश मिळत असल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व १२ मतदारसंघाचे सुरुवातीच्या कलानुसार महायुतीला मोठा विजय मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

नगर शहर – संग्राम जगताप 20239 मतांनी आघाडीवर.
श्रीगोंदा – विक्रम पाचपुते 7351 मतांनी आघाडीवर
कर्जत जामखेड – राम शिंदे 1042 मतांनी आघाडीवर.
शेवगाव पाथर्डी – चंद्रशेखर घुले पाटील 8075 मतांनी आघाडीवर
राहुरी – शिवाजी कर्डीले 2578 मतांनी आघाडीवर
संगमनेर – अमोल खताळ 7046 मतांनी आघाडीवर
शिर्डी – राधाकृष्ण विखे 19661 मतांनी आघाडीवर.
कोपरगाव – आशुतोष काळे 43794 मतांनी आघाडीवर
नेवासे – विठ्ठल लंघे 6009 मतांनी आघाडीवर.
श्रीरामपूर – हेमंत ओगले 6870 मतांनी आघाडीवर
अकोले – अमित भांगरे 6509 मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Results 2024

राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. त्याचमुळे सहकाराची पंढरी म्हणून जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखले जाते. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २ आमदार (लोकसभा निवडणुकीत निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून खासदार), अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे 3 आमदार, भाजपचे 3 आणि काँग्रेसचे 2 आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रुपाने 1 अपक्ष आहेत.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  
अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
 

Web Title: ahilyanagar vidhan sabha assembly election result 2024 winning candidates bjp shivsena ncp congress mahayuti maha vikas aghadi live ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.