श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाईल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:29+5:302021-08-28T04:25:29+5:30

यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई पाचपुते, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संगीता ...

Anganwadi workers in Shrigonda taluka returned with inferior mobiles | श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाईल केले परत

श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाईल केले परत

यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई पाचपुते, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संगीता इंगळे, कार्याध्यक्ष रजनी क्षीरसागर, उपाध्यक्ष मनीषा माने, अलका बोरुडे, शारदा लोखंडे, छाया भापकर, शोभा थोरात, विजया रंधवे, अनेक अंगणवाडीसेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

सन २०१९मध्ये अंगणवाडी सेविकांना शासनाने पोषण अभियानासाठी मोबाईल पुरविले होते. त्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रकल्पात जाऊन मोबाईल परत करण्याचे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली सुरू केले आहे.

शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यासाठी करतात. मात्र, या मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने ते वारंवार हँग होतात. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना काम करणे कठीण झाले होते. जोपर्यंत शासन चांगल्या प्रतीचे मोबाईल देत नाही व मराठी भाषेतून ही सुविधा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे श्रीगोंदा तालुकाध्यक्षा संगीता इंगळे व नंदाताई पाचपुते यांनी सांगितले.

---------

फोटो - पानावर

Web Title: Anganwadi workers in Shrigonda taluka returned with inferior mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.