कोपरगाव : येवला रेल्वे स्थानकाचे प्रबंधक अनिल शुक्ला यांना मध्ये रेल्वेच्या सोलापूर विभागात नुकतेच उत्कृष्ठ स्टेशन प्रबंधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर येथे मध्य रेल्वेचा ६५ वा रेल्वे २०२० सप्ताह सोलापूर येथे पार पडला. महाप्रबंधकाचे पदक, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
शुक्ला यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात येवला रेल्वे स्थानकावरून पेट्रोलचे टँकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनच्या चाकामध्ये बिघाड असल्याने चालकाच्या वॉकीटॉकीवरून संदेश देत निदर्शनास आणून दिले होते. त्यावर चालकाने लागलीच मालगाडी उभी केली होती. त्यानंतर तब्बल सहा तास ही मालगाडी जागेवर उभी होती. त्यानंतर हि मालगाडी येवला स्टेशनमध्ये आणून उभी केली होती. शुक्ला यांच्या समयसूचकतेमुळे रेल्वे रुळांचे होणारे नुकसान टळले. त्याचबरोबर पेट्रोलचे टँकर पलटी होऊन होणारी दुर्घटना देखील टळली होती. तसेच रेल्वे स्थानकही उत्तमरित्या ठेवल्याने वरिष्ठांनी दखल घेत त्यांना सन्मानित केले आहे. मध्य रेल्वेच्या गौरवशाली पुरस्कारातील हा एक पुरस्कार आहे. शुक्ला यांनी आजवर सोलापर विभागातील विविध रेल्वे स्थानकावर स्टेशन प्रबंधक म्हणून काम केले आहे.
..................
फोटो२२- शुक्ला पुरस्कार, कोपरगाव
221220\img_20201222_151223.jpg
सोलापर येथे वरिष्ठांच्या हस्ते उत्कृष्ठ स्टेशन प्रबंधक पुरस्कार स्वीकारताना अनिल शुक्ला.