Anna Hajare : 10 दिवसांत मंदिरे उघडा अन्यथा; अण्णा हजारेंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:09 PM2021-08-28T20:09:43+5:302021-08-28T20:25:11+5:30

Anna Hajare : मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील

Anna Hajare : Temples open in 10 days otherwise; Anna Hazare's direct warning to the government | Anna Hajare : 10 दिवसांत मंदिरे उघडा अन्यथा; अण्णा हजारेंचा सरकारला थेट इशारा

Anna Hajare : 10 दिवसांत मंदिरे उघडा अन्यथा; अण्णा हजारेंचा सरकारला थेट इशारा

ठळक मुद्दे मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे.

नगर – राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले, तसेच सरकारला इशाराही दिला.  

मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला. नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

Anna hazare

अण्णा हजारे पुढे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत, असे अण्णांनी म्हटले आहे. 

दरम्यान, वसंत लोढा यांनी यावेळी मंदिर बचाव कृतीसमितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती देवून पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. निवेदनावर विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष अभय अग्गारकर व शिर्डी साईबाबा देवस्थानचे माजी ट्रस्टी सचिन तांबे यांच्या सह्या आहेत.
 

Web Title: Anna Hajare : Temples open in 10 days otherwise; Anna Hazare's direct warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.