अण्णा हजारे करणार उद्या दिल्लीत अांदोलनाची घोषणा, लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा अांदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 06:37 PM2017-10-01T18:37:21+5:302017-10-01T18:44:37+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची घोषणा करणार आहेत़
पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सोमवारी सकाळी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन दर्शन घेणार असून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल व स्वामीनाथन आयोगाकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलनाची घोषणा करणार आहेत़ अण्णा हजारे तीन वर्षांपासून पंतप्रधान मोदी यांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतकºयांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पंतप्रधान कार्यालयाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात येत आहे़ पंतप्रधान मोदी यांचे भाषण वेगळे व कृती वेगळी अशी टिकाही अण्णांनी सातत्याने केली असून मोदी यांना देशातील गैरप्रकार थांबवायचेच नाहीत असा अर्थ यातून निघत असल्याचा आरोपही अण्णांनी केला होता़ दरम्यान, सोमवारी महात्मा गांधी जयंती असल्याने अण्णा हजारे दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या प्रेरणास्थळाचे दर्शन घेणार आहेत़ तेथे दर्शन घेऊन प्रेरणास्थळी चिंतन करतील. त्यानंतर ते लोकपाल व शेतकºयांना वरदान ठरणाºया स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणार आहेत़ अण्णा हजारे थेट दिल्लीतूनच आता आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत़ ---