राहाता : येथील जैन श्रावक संघाच्या मंडळाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. संघपती पदी अनिल पिपाडा, खजिनदार सुनील धाडीवाल, सचिव तुषार मुथा तर विश्वस्त पदी सुवालाल सुरजमल मुनावत, महावीर पिपाडा, सुमतीलाल ताथेड, विरेश रुणवाल, नेमीचंद लोढा, ललित पिपाडा, पारस पिपाडा, निलेश चोरडीया, महेंद्र लोढा, कांतीलाल बुरड यांची निवड करण्यात आली. तसेच संघाचे ज्येष्ठ सदस्य बाबूलाल पिपाडा, पोपटलाल चोरडिया, रमणलाल रुणवाल, दयाराम पिपाडा, डॉ. अशोक लोढा, सुरेंद्र सांड, विजय मुथा यांची सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली. यावेळी विलास गोठी, देवेंद्र मुनावत, डॉ. दिलीप लोढा, स्वप्निल लोढा, शीतल पिपाडा, सुनील पिपाडा, ललित गोठी, देवेंद्र मुनावत उपस्थित होते.
फोटो१६- जैन श्रावक संघ पदाधिकारी, राहाता
यावेळी संघपती पिपाडा म्हणाले, सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन काम करु तसेच समाजाने माझ्यावर व विश्वस्तांवर जी जबाबदारी टाकली आहे. त्या जबाबदारी प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम करु. डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले, जैन श्रावक संघात होतकरू व काम करणाऱ्या लोकांची संघपती व विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे आहे. ते समाजासाठी तळागळातील घटकांपर्यंत सेवा देण्याचे काम नवनिर्वाचित सदस्य करतील याचा मला विश्वास आहे.