राहुरी तालुक्यात वाळू चोरी विरोधी पथकांनी प्रवरा व मुळा नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिजाचे वाहतूक करताना जप्त केलेल्या ४३ वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित केले आहेत. तरीही अद्याप दंडाची रक्कम भरली नाही. राहुरी येथे जप्त केलेल्या या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
यात २३ टॅम्पो, पाच ट्रॅक्टर, तीन डंपर, पाच पिकअप, छोटाहत्ती, ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहन मालकांकडे महसूल विभागाची सुमारे ६४ लाख ४८ हजार रुपये वसुली येणे आहे. या वाहनांचा लिलाव करून वसुली करण्यासाठी उपजिल्हाधिकारी
यांनी परवानगी दिली आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार शेख यांनी केले आहे.