खबरदार..नगरकरांनो, रात्री घराबाहेर पडाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:31 PM2020-07-03T14:31:27+5:302020-07-03T14:34:05+5:30

नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत  संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे, असा आदेश शुक्रवारी (दि.३ जुलै) जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला आहे.

Beware .. citizens, if you go out at night ... | खबरदार..नगरकरांनो, रात्री घराबाहेर पडाल तर...

खबरदार..नगरकरांनो, रात्री घराबाहेर पडाल तर...

अहमदनगर : नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत  संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे, असा आदेश शुक्रवारी (दि.३ जुलै) जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला आहे.

जिल्हाधिका-यांनी काढलेला हा आदेश ३ ते १७ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. यात तातडीच्या वैद्यकीय कारणाव्यक्तीरिक्त इतर कारणासाठी घराबाहेर पडता येणार नाही. 

हा नियम शासकीय, निमशासकीय, महामंडळे इतर आस्थापना असलेले अधिकारी, कर्मचारी, रुग्णालये, दवाखाने, औषधालये, इलेक्टीसिटी, पेट्रोल पंप, प्रसार माध्यमे, होम डिलेवरी सेवा, अत्यावश्यक सेवा यांना लागू राहणार नाही. 

नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पथकांची स्थापना केली आहे. ही पथके नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तरी नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Web Title: Beware .. citizens, if you go out at night ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.