मानवसेवा प्रकल्पात स्वच्छतागृहाचे भूमिपूजन
By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:38+5:302020-12-08T04:18:38+5:30
अहमदनगर : समाजातील निराधार, वंचित मनोरुग्णांना मायेने आधार देणाऱ्या अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास रेलफोर फाऊंडेशन,पुणे यांच्या ...
अहमदनगर : समाजातील निराधार, वंचित मनोरुग्णांना मायेने आधार देणाऱ्या अरणगाव येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पास रेलफोर फाऊंडेशन,पुणे यांच्या आर्थिक सहयोगातून सुसज्ज स्नानगृह व स्वच्छतागृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन रेलफोर फाऊंडेशनचे व्यवस्थापक नितीन घोडके यांच्या हस्ते झाले.
यावेळी पुणे येथील सेवादीप प्रकल्पाच्या किशोरी अग्निहोत्री, आदिवासी विकास विभाग शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे (पळशी) अधीक्षक भाऊसाहेब पटेकर, सोनेवाडीचे उपसरपंच नितीन दळवी, सदस्य नंदू दळवी, एकनाथ सातदिवे, कल्याण मुठे, रमेश गुंजाळ, विनोद कुसळकर, अंबादास शिंगारे, चांगदेव कापसे आदी उपस्थित होते.
संस्थेचे प्रमुख दिलीप गुंजाळ म्हणाले, अमृतवाहिनी संस्थेचे मानवसेवा प्रकल्प बेवारस मनोरुग्णांसाठी हक्काचे घर बनले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३० मनोरुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सहाशेपेक्षा जास्त मनोरुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांचे कुटुंब शोधून पुनर्वसन करण्यात आले आहे. यावेळी रेलफोर फाऊंडेशनच्या वतीने मानवसेवा प्रकल्पाला कॉट, गादी, बेडशीट आदि गरजेचे साहित्य देण्यात आले.
मानवसेवा प्रकल्पात ३० बेवारस पुरुष व महिलांवर उपचार सुरू असून, त्यांच्या स्वच्छता व स्नानगृहाची मोठी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन सदर प्रश्न पुणे येथील रेलफोर फाऊंडेशनने सोडविल्याबद्दल मानवसेवा प्रकल्पाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद माळी, सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, सुशांत गायकवाड, मनीषा ठोसरे, अशोक मदणे, अजय दळवी, कृष्णा बर्डे, अनिता मदणे, अंबादास गुंजाळ सिराज शेख आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
--