बोटा धरण ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:44 PM2019-10-27T12:44:48+5:302019-10-27T12:46:04+5:30
संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे.
बोटा : संगमनेर तालुक्याचे पठारभागात शेतशिवारातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील कचनदीवरील कोटमारा धरण पुन्हा एकदा सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे.
मोसमी पावसाने आणि परतीच्या पावसाने पठारभागात सर्वदूर जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत पडतच असल्याने बोटा, घारगाव, सारोळेपठार आणि लगतच्या गावांमध्ये शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. पठारभागातील डाळिंबाच्या बागावर परिणाम झाला आहे. कचनदीवरील कुरकुटवाडी आंबीदुमाला परिसरातील कोटमारा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून भरून वाहू लागले आहे.