कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्कपासून ते रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंत वैद्यकीय साहित्य विक्री सध्या जोमात आहे. त्यात आता विविध कंपन्यांच्या आॅक्सिजन यंत्रांची भर पडली आहे. द्रवरुपातून वायूरुपात आॅक्सिजन तयार करणारे राज्यात मोजकेच प्रकल्प आहेत. याच प्रकल्पातून राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना द्रवरुप आॅक्सिजनचा पुरवठा केला जाते. स्थानिक प्रकल्पात द्रवरुपातून वायूरुपात आॅक्सिजन सिलेंडरमध्ये भरून तो विकला जातो. या सिलेंडरची टंचाई राज्यभर आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला असताना आता ही आॅक्सिजन यंत्रे रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहेत.
सध्या काही सामाजिक संस्थांनीही कोविड सेंटर, रुग्णालयांना अशी यंत्रे भेट देऊन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे, तर काहींनी ही यंत्रे भाड्याने देण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. घरगुती वापरासाठीही या यंत्रांची खरेदी केली जात आहे.
आॅक्सिजन स्प्रेकिंमत- ५५० रुपये अधिक जीएसटी, वापर- दर अडीच तासांनी नाकावर स्प्रे मारणे, क्षमता- १२ लिटर, मुंबईमध्ये अनेक कंपन्यांकडून निर्मिती.
आॅक्सिजन कन्व्हर्टरकिंमत- ३२,७०० रुपये अधिक जीएसटी, वापर- गरजेनुसार व पंख्यासारखा वेग वाढवून आॅक्सिजन तयार करता येतो. विजेवर चालणारे हे उपकरण आहे. यंत्राच्या दोन नळ््या दोन्ही हातांनी नाकपुड्यासमोर धरून श्वास आत घेतला जातो. सहा तास सलग आॅक्सिजन मिळतो. क्षमता- ५०० एम. एल.पाणी, गरजेनुसार यंत्रात पाणी टाकून आॅक्सिजन तयार केला जातो. थायलंड, इटलीमध्ये यंत्रांची निर्मिती
आॅक्सिजन कॅन व आॅक्सिजन सिलेंडरच्या पुरवठ्यावरील संपूर्ण नियंत्रण शासनाकडे गेले आहे. त्यामुळे घरगुती आॅक्सिजन निर्मिती करणाºया यंत्रांना मागणी वाढली आहे. इमारत किंवा सोसायटीतील रहिवासी सामुदायिकपणे कन्व्हर्टर खरेदी करीत आहेत. -संदीप सुपेकर, स्थानिक विक्रेते.