कोपरगावात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:21+5:302020-12-23T04:17:21+5:30

कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी ...

Candidature applications can be filed in Kopargaon from today | कोपरगावात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

कोपरगावात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बु., मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. दि. २५, २६, २७, डिसेंबर हे सुटीचे तीन दिवस वगळून ३० डिसेंबरला अंतिममुदत असणार आहे. गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी ४ जानेवारी २०२१ सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत, ४ जानेवारी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, मतदान शुक्रवारी १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहील, तर मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे होणार आहे.

.........

कोपरगाव येथे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी येणारे उमेदवार व त्यांच्यासोबत असलेल्यांनी मास्क घालणे व सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

योगेश चंद्रे, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कोपरगाव

............

कोपरगाव तालुका

* ग्रामपंचायत - २९

* एकूण प्रभाग - १०२

* एकूण सदस्य - २७९

* पुरुष मतदार - ३२,८९६

* महिला मतदार - ३०,८८९

* एकूण मतदार - ६३,७८५

Web Title: Candidature applications can be filed in Kopargaon from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.