दरीत कार उलटली, तिघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:23+5:302021-03-08T04:20:23+5:30
घारगाव : नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत ...
घारगाव : नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील नवीन माहुली घाटात पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातामध्ये तिघेजण सुदैवाने बचावले. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील मितेश कथेरिया (वय ३५), भार्गव रामोलिया (वय २५, रा. सुरत), स्नेहल पोकिया (रा. भरुच, वय ३०) हे तिघेजण कार क्रमांक (जीजे १६, सीजी ७३३६)ने देवदर्शनासाठी नाशिक - पुणे महामार्गाने भीमाशंकरला निघाले होते.
रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे तरूण माहुली घाटातून जात असताना चालक मितेश याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्ग सोडून साठ ते सत्तर फूट खोल दरीत कोसळली. यात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातातून तिघेही तरूण बचावले असून, किरकोळ जखमी झाले आहेत. कार उलटल्याचे समजताच डोळासणे महामार्ग पोलीस अरविंद गिरी, साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी येत क्रेनद्वारे कार दरीतून वर काढली.