तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:45+5:302021-07-07T04:26:45+5:30
श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील जळगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा ...
श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील जळगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये बाळासाहेब सोपान चौधरी, अनिकेत बाळासाहेब चौधरी, प्रकाश केरू वाणी (सर्व रा. जळगाव), रवींद्र सीताराम शेळके (शिंगवे) यांचा समावेश आहे. मृत तरुण सुजित बाबासाहेब चौधरी याचे वडील बाबासाहेब दत्तू चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे.
सुजित बाबासाहेब चौधरी याने २ जुलैला घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. विहिरीजवळ त्याचा मोबाईल मिळून आल्याने कुटुंबीयांना हा प्रकार समजला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले होते. प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शेतीच्या वादातूनच आरोपींनी सुजित यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सोमवारी रात्री देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे याप्रकरणी तपास करत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी बाळासाहेब चौधरी व रवींद्र शेळके फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
-----