कोपरगावात सार्वजनिक शांतता भंग करणा-या नऊ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:54 AM2020-05-19T10:54:13+5:302020-05-19T10:55:00+5:30
कोपरगाव शहरात कोरोनाच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक शांतता भंग करणा-या ९ जणांविरुध्द कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव : शहरात कोरोनाच्या संचारबंदीचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक शांतता भंग करणा-या ९ जणांविरुध्द कोपरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे आपल्या पथकासह शहरात सोमवारी (दि.१८ ) रात्री गस्तीवर होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील आयेशा कॉलनी येथील नुरे इस्लाम मजीद जवळ काही नागरिक कोरोना साथ रोगाकडे दुर्लक्ष करून तोंडाला मास्क न लावता आपापसात जोरजोरात आरडाओरडा करून भांडत असल्याचे या पथकाला आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वसिम युसुफ शेख, अजीज कासम कुरेशी, शकील मेहबूब शेख, सोफियान सलीम कुरेशी, अकिल बशीर शेख, मुन्ना राजू कुरेशी, अफान मुस्ताक शेख, शकील इस्माईल कुरेशी, जावेद युसुफ शेख ( सर्व रा. आयेशा कॉलनी, कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.