आठवडाभरात बोठे याच्याविरोधात दाखल होणार दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:30+5:302021-06-01T04:16:30+5:30
बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या घडवून आणली. घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली ...
बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या घडवून आणली. घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. बोठे मात्र पसार झाला होता. पोलिसांनी प्रथम अटक केलेल्या आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, बोठे याला पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली. या अटकेला १० एप्रिल रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत. बोठे याला अटक झाल्यानंतर चौकशीत नव्याने अनेक बाबी समोर आल्या असून, पोलिसांनी सर्व पुराव्यांची जुळणी केली आहे. फरार झाल्यानंतर बोठे याला कुणी मदत केली, तो कुणाच्या संपर्कात होता, याची माहिती घेत पोलिसांनी त्यांचेही जबाब घेतले आहेत. या सर्व पुराव्यांचा दोषारोेपपत्रात समावेश राहणार आहे.
-----------------
फॉरेन्सिक लॅबमधून येईना अहवाल
जरे हत्याकांडात पोलिसांनी अटक केलेले आधीच्या पाच आरोपींचे मोबाइल व बोठे याच्या घरातून जप्त केलेला त्याचा आय फोन डिलिट डाटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविलेला आहे. लॅबमधून मात्र अद्यापपर्यंत अहवाल प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर न्यायालयात सादर केला जाणार असल्याचे तपासी अधिकारी पाटील यांनी सांगितले.