अस्तगाव : राहाता तालुक्यातील केलवड गावासाठी सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे भूमिपूजन केलवड गावच्या सरपंच मीना गोडगे व उपसरपंच दत्तू गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.गेल्या पंधरा वर्षापासून केलवडचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत ‘लोकमत’ने अनेक वेळा पाठपुरावा केला होता. गावात नळाला पाणी येते, परंतू ते पाणी पिण्यालायक नसल्याने आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतू आता गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाल्यामुळे गावठाणासह वाड्यावस्त्यावरील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गावात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. या मागणीला यश आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रविवारी दहेगाव शिवारात या योजनेच्या विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य काळू रजपूत, काँग्रेस कमिटी सदस्य अंजाबापू जटाड, सरपंच मीना गोडगे, उपसरपंच दत्तू गोसावी, ग्रामसेवक एस. एस. सांगळे, बबन गोडगे, संजय गोडगे, बाबासाहेब लवरे, भारत राऊत, राजू रोहम, अनिल गमे, भागवत कांदळकर, रमेश घोरपडे, जनार्धन गोसावी, संदीप गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.जलशुध्दीकरण प्रकल्पकेलवड येथे सरपंच मीना दत्तू गोडगे यांच्या पुढाकारातून गावात जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. गावठाण परिसरातील नागरिक याचा लाभ घेत आहेत. या केंद्रावर नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. गावातील १०० ते ११० नागरिक याचा फायदा घेतात. त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कार्ड दण्यात आले आहे. ५ रुपयांत २० लिटर पाणी देण्यात येते.